चौगान येथे ‘संगीत- थैमान’ हा तीन अंकी नाट्यप्रयोग संपन्न

0
44

युथ नाट्य कला मंडळ चौगानचे आयोजन

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथे खास मंडई निमित्ताने यूथ नाट्य कला मंडळ यांच्या वतीने संगीत-थैमान या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी दिपप्रज्वलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नितीन कोडवते यांच्या हस्ते झाले.
तर उद्घाटन म्हणून माजी जि.प.समाजकल्याण सभापती डॉ. राजेश कांबळे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्या स्मिता पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, तालुका काॅंग्रेसचे उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, बाजार समितीच्या उपसभापती सुनिता तिडके, नगरसेविका लता ठाकुर, नगरसेविका वनीतात अलगदेवे, माजी सरपंच राजेश पारधी, अण्णाजी ठाकरे बाबासाहेब, बाजार समितीचे संचालक राजेश तलमले, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, बाजार समितीचे संचालक संजय राऊत, बाजार समितीचे संचालक अरूण अलोने, बाजार समितीचे संचालक ब्रम्हदेव दिघोरे, माजी नगरसेवक जगदीश आमले, कंत्राटदार विजय भागडकर, माजी सरपंच ईश्वर ठाकरे, माजी से.सो.अध्यक्ष योगेश ढोरे, माजी सरपंच रविंद्र ढोरे, सुरेश चौधरी, सीडीसीसी मॅनेजर रोशन चौधरी, अनिल ढोंगे, गणेश चौधरी, उपसरपंच भावेश दोनाडकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना मान्यवर म्हणाले की, राज्यातील विद्यमान सरकार आरक्षण संपविण्याचा डाव आखत असुन संवैधानिक मुल्यांची देखील पायमल्ली करण्याचे काम सुरू आहे. मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करून ओबीसींवर अन्याय करीत असल्याचे देखील यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युथ नाट्य कला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here