prabodhini news logo
Home चंद्रपूर शहरात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा : आम आदमी पार्टी चंद्रपूर

शहरात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा : आम आदमी पार्टी चंद्रपूर

0
171

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर: शहरात मागील काही महिन्यांपासून अवैध उत्खनन करणाऱ्यांची टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली असून अनेक ठिकाणी रेती, मुरूम यांची अवैध पद्धतीने उपसा करून शासनाचे महसूल बुडवण्याचे काम ही टोळी करत आहे दिवसाढवळ्या होणाऱ्या या चोरीला रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन तसेच तहसीलदार यांना अपयश आले आहे. अवैध धंद्यातील टोळी आणि संबंधित विभाग यांच्यामध्ये आर्थिक साठं लोठं असल्याचे आरोप आम आदमी पार्टीचे वाहतूक सेल चें जिल्हा उपाध्यक्ष संघम सागोरे यांनी केला आहे. तसेच युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी प्रशासनाला या प्रकरणात सात दिवसात गुन्ह्यात वापरण्यात आलेले मुद्देमाल जप्त करून कारवाई करावे अन्यथा आप तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळेला युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, वाहतूक जिल्हाउपाध्यक्ष संघम सगोरे, क्रिश कपूर, आदित्य साव, अजय दुपारे व आप चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here