उमेश एखंडे
सेलू बिबी प्रतिनिधी
आज सिंदखेड राजा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा रेस्ट हाऊस येथे दुपारी दोन वाजता बैठक संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराज सावर्जनिक शिवजयंती निमित्त बैठकीचे आयोजन केले होते या शिवजयंतीला खेड्या पाड्यातील सर्व शिवभक्त सहभागी होणार आहे.
धुंम धडाक्यात शिवजयंती साजरी करू सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी बालासाहेब पाटील कळकुंबे यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सिंदखेड राजा निवड करण्यात आली ह्या बैठकीचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक मराठा नेते अशोक राजे जाधव यांनी केले होते याबरोबर ग्रामीण भागातील कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गोविंदराव टेके, शिवाजी पुरंदरे, बालासाहेब शेळके, डॉ. दत्तात्रय कळकुंबे पाटील, संजय उगले, विठ्ठल भुतेकर चंद्रकांत साबळे. दीपक किंगरे अमोल काकडे, डॉक्टर सोळंके, दीपक एखंडे, सुरेश कठोरे, चेतन झाल्टे, अर्जुन जाधव, बाबासाहेब पुरंदरे, राहुल काकडे यासह शहरातील व परिसरातील जिजाऊ भक्त व शिवभक्त हजर होते.

