सिंदेवाही प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे देवीदास विठ्ठल सुकारे यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. देवीदास सुकारे यांनी घरासमोर बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. रात्री जेवण केल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही बकऱ्या चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. शेतकऱ्याचे २५ ते ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून पोलिस अज्ञात चोरट्याचा शोध घेत असल्याची माहिती आली आहे.

