युनियन मध्ये शिक्षक संघटक युनिट व कायदेशीर सल्लागार यादी जाहीर

0
48

सोलापूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश सरचिटणीस मा. सुरेश मोहिते यांनी सोलापूर शिक्षक संघटक युनिट पदाधिकारी व सोलापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार यादी जाहीर केली. सोलापूर महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून सर्व नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी यांच्या हस्ते पत्र देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुरज अरखराव वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार सह पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here