राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी

0
43

घुग्घुस प्रतिनीधी
प्रबोधिनी न्युज

घुग्घुस – येथील भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस, समता सैनिक दल घुग्घुस, यशोधरा महिला मंडळाच्या अनुषंगाने घुग्घुस येथे प्रथमच राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून भव्य दोन दिवसीय कार्यक्रम साजरा करण्यात आला.
दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस निरीक्षक मा. आसिफराजा शेख,
कार्यक्रमाचे अध्यक्ष, रिता देशकर, मा.आभासचंद्र सिंह, साहेब, मा. हर्षिद दातार साहेब, प्रमुख उपस्थिती, सुरेश मल्हारी पाईकराव, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस, मायाताई सांड्रावार, केंद्रीय शिक्षिका कार्याध्यक्ष – चंदगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, उपाध्यक्ष शरद पाईकराव, कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे,
यशोधरा महिला मंडळ उपाध्यक्षा प्रतिमा कांबळे, सचिव स्मिता कांबळे, कोषाध्यक्ष रमाबाई सातारडे यांच्या उपस्थितीत
तथागत भगवान गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले. पु.प.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
महिलांसाठी,व लहान मुलांन साठी, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मटका फोड, रस्सीखेच, संगीत खुर्ची, मेणबत्ती स्पर्धा, सायंकाळी सात वाजता कराओके भीम गित व नृत्य आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात शेकडो स्पर्धेक महिला, पुरुष व लहान मुलांनी सुध्दा मोठ्या संख्येने भाग घेतला होता.
प्रियदर्शनी कन्या विद्यालयातील श्रद्धा गुच्छाई हिने माता सावित्रीबाई ज्योतिबा फुले वर आधारित नाट्य सादर केले.

दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . मा. डॉ. राहुल आवारी साहेब, मा. डॉ. राणी बोबडे मॅडम, मा. डॉ. सौरभ सोनटक्के साहेब, मा. डॉ. जैनी सोनटक्के मॅडम, मा. डॉ. शुभांगी ठाकरे मॅडम, मा.अतकुरे साहेब, यांच्या उपस्थितीत भव्य मोफत रोगनिदान शिबीरामध्ये शेकडो घुग्घुस वासियांनी शिबीराचा लाभ घेतला.
सायंकाळी आठ वाजता राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई भीमराव आंबेडकर, यांच्यावर आधारित तीन पात्री नाटक स्मिता कांबळे, रिया कांबळे, सोनल पाझारे, मनस्वी भगत यांनी सादर केले होते.

या कार्यक्रमाचे संचालन शरद मल्हारी पाईकराव यांनी केले तर आभार रिता देशकर यांनी व्यक्त केले.
यशोधरा महिला मंडळ तर्फे भोजनदान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळेस घुग्घुस येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here