prabodhini news logo
Home चंद्रपूर कोसरा लखमापूर भटाळी परिसरातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी: संगम सागोरे

कोसरा लखमापूर भटाळी परिसरातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी: संगम सागोरे

0
249

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर: जिल्ह्यात वाहतूक उत्खननाला प्रशासनाने बंदी घातली असतानाही कोसारा लखमापूर भटाळी परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. आपचे वाहतूक संगठन चे उपाध्यक्ष संगम सागोरे यांना गुरुवारी (8 फेब्रुवारी) हवेली गार्डन परिसरात फिरताना हे प्रकरण लक्षात आले.

सगोरे यांनी सांगितले की, “मी हवेली गार्डन परिसरात फिरत असताना मला नदीच्या काठावरून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसले. मी वाहतूक करणाऱ्यांना रॉयल्टीची माहिती घेतली असता नकार देत आम्ही कोसारा लखमापूर भटाळी परिसरातून उत्खनन करतो असे त्यांनी सांगितले आणि दमदाटी करत ‘ तुम्ही कुणालाही कॉल करा कुणीच फोन उचलणार नाही असे सांगितले असता रेती तस्करी करणाऱ्या ची गोष्ट खरी ठरली आणि प्रशासनिक कुठल्याही अधिकाऱ्यांनी संपर्क केला असता फोन उचलला नाही?’ असे म्हटले.”

या घटनेवरून प्रशासनाच्या संगनमताने रेती तस्करीचा संशय निर्माण होत आहे. सागोरे यांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

वाढू तस्करीमुळे नद्यांचे नैसर्गिक स्वरूप नष्ट होत आहे. तसेच, नद्यांमधील गाळाचे प्रमाण वाढून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. या तस्करीमुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने त्वरित तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, वाढू तस्करीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी आम् आदमी पक्षाचे केली आहे.या वेळेस आप चे विकास विक्की मंडळ,इंजिनियर आदित्य साव,विनीत तावाळे,आर्यन रामटेके, पियूष पोयाम सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here