★ वृत्तवाहिनी संघाचा मक्तेदार संघावर दणदणीत विजय
★ बिन बाद अवघ्या 15 चेंडूत 56 धावा काढत वृत्तवाहिनी संघ विजयी
सांगली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्रिकेट स्पर्धा सुरू असून अधिकारी, विविध विभागातील कर्मचारी, मक्तेदार आणि पत्रकारांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वृत्तवाहिनी संघाने मक्तेदार संघावर दणदणीत विजय मिळवला. सलामीच्या फलंदाजांनी बिन बाद, अवघ्या 15 चेंडूत 56 धावा काढत वृत्तवाहिनी संघ विजयी झाला. संदेश लगाडे आणि अक्षय आंबी यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला एकतर्फी विजयी केले.
प्रथम फलंदाजी करताना मक्तेदार संघाने सहा षटकात 52 धावा केल्या होत्या. विजया साठी 53 धावांच लक्ष वृत्तवाहिनी संघाच्या समोर होतं. वृत्तवाहिनी संघाचे सलामीचे फलंदाज संदेश लगाडेने 26 आणि अक्षय आंबीने 27 धावा काढल्या. आक्रमक फलंदाजी करत संघाला दोघांनी प्रत्येकी तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. दोघांनी अवघ्या 15 चेंडूतच 56 धावा काढत विजय मिळवून दिला.
वृत्तवाहिनी संघाचा कर्णधार दिपक कांबळे, रवींद्र कांबळे, अरुण लोंढे, स्वप्नील एरंडोलिकर, अर्जुन यादव, उदय रावळ, सुशांत नलवडे, मल्हारी ओमासे, संदेश लगाडे, अक्षय आंबी, राजेंद्र कांबळे आणि सलीम मुल्ला या खेळाडूंचे सा मी की महापालिकेचे अधिकारी चंद्रकांत आडके यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिला.

