prabodhini news logo
Home उदगीर हे राम,सोयाबीनचे “खोयाबीन” झाले, आणि तुरीचा ‘खराटा’ झाला. असं कसं आमचं प्रारब्ध...

हे राम,सोयाबीनचे “खोयाबीन” झाले, आणि तुरीचा ‘खराटा’ झाला. असं कसं आमचं प्रारब्ध ; घोषीत केलेली नुकसान भरपाई द्या हो…

0
157

हाळी-हंडरगुळी व परिसरातील बळाराजांचा टाहो

विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी

एकेकाळी शेतात राबणा-या व्यक्तीस बळीराजा म्हणत असे.कारण पाऊसमान चांगला होत होता.आणी शेती चांगली सोन्याहुनी पिकायाची.म्हणुन बळीराजा आनंदी व सुखी होता.पण गत कांही वर्षामध्ये निसर्गाचे चक्र उलटे फिरु लागले तसे शासन ही केवळ घोषणाच करु लागले.म्हणुन वैतागलेला ‘राजा’ हा स्व:ताचा ‘बळी’ देऊ लागला.आणि शेतात राबणा-या व्यक्तीला बळीराजा असे म्हणतात.ही एक कथाच होऊन बसली आहे.सुजलाम् सुफलाम् अन् शेतीप्रधान असलेल्या देशातील हाळी व हंडरगुळी ता.उदगीर परिसरातील बहूतांश मध्यमवर्गीय,अल्पभुधारक बळीराजाला विविध कामांसाठी हात जोडत झोळी पसरायची वेळ आलीय तरी ही शासनाने या भागात अजुनही ना अग्रीमची रक्कम दिली ! ना विमा दिला! ना दुष्काळात व अतिपावसात सापडून वाया गेलेल्या सर्वच पिकांची भरपाई दिली.यामुळे काय खावं अन् कसं खावं.हा प्रश्न सर्वांना सतावतोय. पण शासन नावाच्या जमातीला’राजा’ चा ‘बळी’ गेला व ‘बॅंड’ वाजला तरी कांहीच फरक पडत नाही.फोडा = झोडा अण् राज्य करा.हा एककलमी कार्यक्रम ‘नमो’ व ‘ईडीपी” चे सरकार राबवताना दिसते.पावसाअभावी सोयाबीनचे ‘खोयाबीन’ झाले.तसेच तुरीचा ‘खराटा’ झाला तर कापसाचे पोतलोड झाले आहे.हे राम,असे कसे आमचे नशीब?हा प्रश्न बळीराजाच्या काळजाचे पाणी-पाणी करत आहे.. आणि घोषीत अग्रीमची रक्कम व अवकाळीत वाया गेलेल्या पिकांचे नुकसान भरपाई द्या.हो $$ असा टाहो हाळी-हंडरगुळी परिसरातील बळीराजा फोडत असुन, शासन व प्रशासन नावाच्या दगडाला पाझर फुटणार कधी.याकडे लक्ष आहे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here