विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
शरीराला पोषक असलेले गावठी मध अजकाल मिळणे कठीण झाले आहे.व यामागे असलेल्या कारणांपैकी झाडाझुडपां- ची होणारी कत्तल.हे एक कारण होय यामुळे हंडरगुळी शिवारात मोहोळ नामशेष होण्याच्या मार्गावर असुन,या विषयी जनतेला संबंधित विभागाने माहिती देणे व मधमासी संगोपन कसे करावे,हे सांगणे गरजेचे झाले आहे.. विविध प्रकारच्या फुलावर बसुन त्या मधील रस प्राशन करणा-या गावठी माशांच्या मधांचे मोहोळ या भागात असलेल्या लहान-मोठ्या झाडांवर दिसायचे.आणि हे मध घेण्यासाठी माशांना हुसकावण्यासाठी विविध प्रकारच्या आयडिया वापरल्या जात होत्या.तसेच या मोहाळातील मधांचा वापर नवजात शिशुंना चाटवत होते. तसेच जुण्याकाळातील महीलावर्ग हे कुंकू लावण्यापुर्वी भाळी या मोहोळा- पासुन बनलेले मेन लावायच्या आणि मग कुंकू.पण झाडाझुडपांची सर्रास कत्तल होत असल्याने गावठी मधांचे मोहोळ सापडणे दुरापास्त झाले आहे आणि म्हणुन झाडांसह गावठी मधाचे मोहोळ सुरक्षित कसे राहील.याकडे संबंधित विभागाने लक्ष दिले पाहीजे..

