प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नावंदी गावचे सुपुत्र उदगीर तालुक्याचे युवानेते युवराज कांडगीरे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनील तटकरे, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार बाबासाहेब पाटील , महाराष्ट्र राज्याचे पणन महासंघाचे मा.संचालक भरतजी चामले यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी युवराज सतीश कांडगिरे यांची निवड केली. यावेळी भ्रणध्वनीद्वारे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर बाबा शेख ,जिल्हा कार्याध्यक्ष पंडित राव धुमाळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत जी चामले यांनी युवराज कांडगिरे यांचे अभिनंदन केले आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व स्तरातून, सोशल मीडिया माध्यमातून या निवडीबद्दल युवराज कांडगिरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

