जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्युज
सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी
देवळाली प्रवरा, ता- राहुरी येथील नगरपालिका हददीतील सार्वजनिक नागरी सुविधांचा पुर्णपणे बोजवारा उडालेला आहे.
देवळाली प्रवरा शहरातील आदिवासी वस्ती, मातंग वस्ती, वडार गल्ली, राजवाडा परिसर व संपूर्ण गावठाण मधील महिलां व पुरुषांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची पुर्ण दुरावस्था झालेली असुन काही ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने ते उध्वस्त करुन ते जमिनदोस्त केलेले आहेत. ते पुन्हा पुर्ववत करुन शौचालयांच्या डागडूजीची कामे त्वरीत करण्यात यावीत. तसेच आदिवासी स्मशानभुमीला तसेच सर्व समाजाच्या स्मशानभुमीला गेट लावण्यात येऊन तेथे कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करुन तेथे सुशोभीकरण करण्यात यावे.
तसेच देवळाली प्रवरा नगरपालिका हददीमध्ये रुपये ८५ कोटीच्या अंडरग्राउंड ड्रेनेज गटारींचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असुन त्यामधील चेंबरचे बांधकाम व्यवस्थित पणे न करता तसेच त्याला आवश्यक पाणी न मारल्याने ते कुचकामी ठरुन ते भुमिगत
लिकेज होत असल्याने लोकांच्या घरांना ओलाव्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. तसेच भविष्यात काही लोकांच्या बोअरच्या पाण्यात मैला मिश्रित पाणी जाऊन पाणी दुषित होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, तरी सदर यु.जी.डी. बांधकामाची चौकशी करुन बांधकाम ठेकेदारावर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
खटकळी येथील स्मशानभूमीसाठी रक्कम रुपये तीन कोटीच्या पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन त्वरील स्मशानभूमीचे कामास सुरुवात करण्यात यावे. तसेच सर्व स्मशानभूमींच्या भितीची उंची वाढविण्यात यावी, तसेच सर्व स्मशानभुमींमध्ये बसण्यासाठी शेडचे बांधकाम करण्यात यावे.
देवळाली प्रवरा परिसरातील सर्व घरकुलांची दयनिय अवस्था झालेली असुन सदरच्या घरकुलांची त्वरील डागडुजी करण्यात यावी.
देवळाली प्रवरा परिसरातील सर्व नाल्यांची अवस्था देखील दयनीय झालेली असुन सर्व नाल्यांची साफसफाई करुन योग्य दिशेने उत्तार देऊन सांडपाण्याचे नियोजन करण्यात यावे. तसेच राहुरी फॅक्टरी व एकुणच सर्वच नगरपालिका हददीमध्ये साफसफाईचे बारा वाजलेले असुन संपुर्ण परिसरात अस्वच्छेते मुळे दुर्गंध पसरुन डास मोठया प्रमाणात झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणलेल्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सर्व परिसराची त्वरीत साफसफाई करुन नाल्यांवर व मोकळया प्लॉटवर त्वरील औषधांची फवारणी करण्यात यावी,
तसेच शहरातील बहुसंख्य स्ट्रिट लाईट या बंद पडलेल्या अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी महिला, लहान मुले व वृध्दांना फिरणे हे मुश्किल होऊन त्यांना मोठया प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्या त्वरीत चालु करण्यात याव्यात.
तसेच देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात भाजी मंडई उपलब्ध नाही. तरी सदर भाजी मंडईसाठी नगरपालिके मार्फत त्वरीत जागा उपलब्ध करुन देऊन तेथे भाजी मंडई उभारण्यात यावी.
वरील प्रमाणे देवळाली नगरपालिका हददीतील नगरपालिका प्रशासनाने चालविलेल्या ढिसाळ कारभारावर दिनांक १९/०२/२०२४ पर्यंत अंकुश आणून वरील मागण्यानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा आमच्या वंचित बहुजन आघाडी कडुन दिनांक २०/०२/२०२४ रोजी तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके देवळली प्रवारा शहर अध्यक्ष साईनाथ बर्डे राहरी फॅक्टरी प्रसादनगर शहर अध्यक्ष चैतन्य आल्हाट असाराम आल्हाट यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष सोमनाथ कीर्तने, उपतालुकाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, शहराध्यक्ष संदीप कदम, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष योगेश सिनारे, एकलव्य आघाडीचे शहराध्यक्ष नारायण बर्डे, अशोक बर्डे, विशाल बर्डे, एकलव्य आघाडीच्या महिला शहराध्यक्ष पतंगे बाई बर्डे, देवळाली प्रवराचे कार्याध्यक्ष आबासाहेब कदम, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

