विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे गाव व बाजारपेठ असलेल्या हाळी-हंडरगुळी या 2 गावात बाजार पेठेत व राज्यमार्गालगत अस्ताव्यस्त व बेशिस्तपणे थांबलेल्या हातगाड्यां – वर तसेच अन्य वाहनांवर आजवर कोणत्याच अधिका-यांनी कारवाई केली नाही.म्हणुन येथे सताड वेडी — वाकडी वाहने थांबलेली दिसतात.व हातगाडेवाले गाड्यासह इतर साहित्य उदा:-कॅरेट,खपटी व लाकडी बाॅक्स हे रोडवर कसेही ठेवतात. यामुळे येथे कधी पण मोठा अपघात होऊ शकतो व या बेशिस्तपणे थांबणा-या वाहनां – सह हातगाड्यांमुळे अन्य दुकाणदार बंधूंना दुकाणदारी बंद करण्याची वेळ आली आहे.व सर्व सामान्यांना ये-जा करणे ही मुश्कील झाले आहे.तसेच दर रविवारी तर जि.प.शाळेच्या बाजु- ने हंडरगुळीत पायी ये-जा करणे हे धोक्याचे बनले आहे.तेंव्हा मागे एका शांतता कमिटीच्या बैठकीत बोलल्या- प्रमाणे कर्तव्यदक्ष सपोनी.भिमराव गायकवाड व पोहेकाॅ.संजय दळवे हे या प्रकरणात लक्ष घालुन कारवाई करण्याचे “धनूष्य”हाती घ्यावे,व अशी अपेक्षा त्या बैठकीत हजर असलेल्या मान्यवरांसह आम जनतेची आहे..
उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे बाजारपेठेचे केंद्र असलेले आणि लवकरच तालुका व्हायच्या मार्गावर असलेल्या हाळी-हंडरगुळी या गावी आसपासच्या 50 / 60 गावातील जनतेसह वाहनांची सतत गर्दी असते. यामुळे राज्यमार्गासह बाजारपेठेत या भागातील वाहनांची वर्दळ वाढत आहे.आणी बहूतांश वाहनधारक हे बेशिस्तपणे,वेडीवाकडी गाडी पार्क व लाॅक करुन जातात.व तसेच फळांचे गाडेवाले अन्य साहित्य कसेही ठेवत असतात.यामुळे अन्य व्यापारीबंधू – ना याचा सर्वाधिक ञास होतो.म्हणुन या आमच्या दुकाणापुढे कशीही पार्कींग करु नका.प्लिज.अशी विनंती करणार्र्या व्यापा-यांनाच ही जागा तुझ्या “बा” ची आहे.का.अशी भाषा सा.बां.खात्याच्या जागेवर अतिक्रमन करुन आपले धंदे थाटलेले कांही हातगाडेवाले वापरत असल्याची चर्चा ऐकू येते.आणि याबाबत अनेकांनी पेपरबाजी केली तरीही आजवर या मुजोरांवर कुणीच का कारवाई केली नाही.याचे ही अनेकांना नवल वाटते. कारण वार्षीक लाखों रुपये भाडे देत अनेकांनी विविध प्रकारचे व्यवसाय सुरु केले.माञ तेथेच लहान-मोठ्या वाहनांनी तसेच हातगाडेवाल्यांनी स्व:ताच्या “बा” ची जागा असल्या — सारखे B & C च्या जागेवर कब्जा केल्याचे दिसुन येते.व दिवसभर या गाड्या जागच्या हालत नसल्यामुळे अन्य भाडेकरु दूकाणदारांना मोठ्या प्रमाणात घाटा सहन करावा लागतोय व याप्रकारामुळे अपघात होऊ शकतो श्री. भिमराव गायकवाड हे सपोनी म्हणुन ड्यूटीवर येताच पहीले कांही दिवस त्यांनी हातगाडेवाल्यांना अशा संभाव्य कारवाईची ” वाॅर्नींग ” दिली होती.तिचा कांहीच ” इफेक्ट ” झाला नाही.असे एकंदर चिञ पाहता वाटते. तेंव्हा आता फक्त “वाॅर्नींग” न देता “खाकी” ची ‘पाॅवर’ दाखविण्याची वेळ आली असुन जि.प.शाळे भोवती बाजार दिवशी व राज्यमार्गालगत तसेच बाजारपेठेत बेशिस्तपणे उभा असलेल्या गाड्या,हातगाडे यांचेवर कायद्याचा “हाबाडा” देण्याची गरज आहे.अन्यथा बेशिस्तपणे थांबणा-या गाड्या व हातगाड्यांमुळे सामाजिक शांतता भंग होण्याची भीती जाणकार हाळी-हंडरगुळीकरांतुन वर्तवली जाते. राज्यमार्ग, मेन मार्केटसह जि.प.शाळे भोवती बेशिस्तपणे थांबणा-या सर्व प्रकारच्या गाड्यांवर जप्तीसह दंडाची कारवाई होणे गरजेचे आहे.असे स्पष्ट मत चेअरमन संग्रामजी भोसले यांनी व्यक्त केले आहे.तेंव्हा यावर कोण व कधी कारवाई करणार याकडे जनता लक्ष ठेवून आहे..

