सिंदेवाही येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

0
93

जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान चे आयोजन

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

अनंत श्री. विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्य दर वर्ष मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येतात. यावर्षीं सुध्दा संपूर्ण राज्यात रक्तदान शिबीरे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये होणार आहेत.महाराष्ट्रात शिकलसेल अनेमिया, हिमोफितीया, थैलेंसेमिशा, ब्लड कॅनसर, किडनी फेल्युजर जास्त आढळतात, अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे या संप्रदायामार्फत निश्चित केल आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त ५ मिनीटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत. तुमच्यासाठी ते आहे फक्त दान ! मात्र गरजूंसाठी वे आहे. जीवनदान !! स्वतः बरोबर आपल्या मित्र व नातेवाहीकांत या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा.

तरी आपल्या व्यस्त दिनचर्येतुन आमच्यासाठी आपल्या बहुमोल वेळ काढुण दिनांक १०/०२/२०२४ ला स. ८ ते ४ वाजेपर्यंत,स्थळ – ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे रक्तदान करणास येऊन या सामाजिक कार्यात सहभागी होऊन उपकृत करावे असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here