prabodhini news logo
Home क्राईम नवरगांव भारत प्राथमिक विद्यालय येथील सिलिंग फॅनची चोरी

नवरगांव भारत प्राथमिक विद्यालय येथील सिलिंग फॅनची चोरी

0
116

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

भारत प्राथमिक विद्यालय, नवरगांव येथील पाच वर्गखोल्यांतील सिलिंग फॅन अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. याच शाळेतील सीपीयू मशीन अज्ञात चोरट्यांनी २५ जानेवारी २०२४ ला चोरून नेली. मात्र, त्याचा पत्ता लागत नाही तर पुन्हा काही दिवसांतच ही सिलिंग फॅन चोरीची घटना घडली. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याने भारत प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चंदा समरीत यांनी पोलिस विभागाला तक्रार दाखल केली असून चोरट्यांना पकडून कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here