prabodhini news logo
Home आर्थिक स्व. किशोर थेरकर यांच्या परिवाराला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने...

स्व. किशोर थेरकर यांच्या परिवाराला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने आर्थिक मदत

0
108

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

पोंभुर्णा :- स्थानिक देवाडा खुर्द येथील किशोर थेरकर त्यांचे 15 दिवसापूर्वी अपघाती निधन झाले, त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुले असा आप्त परिवार आहे., स्वर्गीय थेरकर हे एका खाजगी शैक्षणिक संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत होते, सदर संस्थेला अजूनही अनुदान प्राप्त नाही. त्यामुळे ते तिथे विनामोबदला काम करीत होते. त्यांच्या अचानक अपघाती निधनमुळं त्यांच्या परिवारावर मानसिक व आर्थिक संकट आले आहेत. ते माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा संघटक या पदावर होते, एक हुशार, समिती बद्दल तळमळीने बोलणारे, वाणीवर प्रभुत्व असलेले, सामाजिक जाणीव असलेले, चांगला लोकसंग्रह असलेले व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेले, याचे खरंच खूप दुःख वाटले. माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. मा. महेश सारनिकर याच्या मार्गदर्शनाने व गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांच्या पुढाकाराने समितिच्या पदाधिकारी, सदस्यांकडून आर्थिक मदत प्राप्त झाली, सदर आर्थिक मदत स्वर्गीय किशोर थेरकर यांच्या देवाडा खुर्द येथील घरी समितीद्वारे एक छोटीशी शोकसभा घेऊन त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आली. या प्रसंगी समितीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष जयपाल कातकर यांनी शोकसभेचे प्रास्ताविक केले तर गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष मा. मनोज उराडे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या तर सचिन मडावि तालुका सचिव यांनी समितीचे आभार व्यक्त केले. तसेच समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांचे कडून स्व. थेरकर यांच्या दोन्ही मुलांची शिशु विकास योजना पॉलिसी काढण्यात आली. या पॉलिसी अंतर्गत त्यांना उच्च शिक्षणासाठी ५ लाख रू शिष्यवृत्ती, व दरवर्षी २५०००/- रू आरोग्य विमा, ३ लाख अपघात विमा आहे. याप्रसंगी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष श्री सूरज कुकुडकर, चामोर्शी तालुका महिला अध्यक्ष सौ.अनुपमा रॉय, मुलचेरा तालुका महिला अध्यक्ष डॉ. मालो , अतुल भडके, किशोर महोरकर, यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here