prabodhini news logo
Home जुन्नर भूमी अभिलेख कार्यालय जुन्नर येथे धडकणार वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा.!!

भूमी अभिलेख कार्यालय जुन्नर येथे धडकणार वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा.!!

0
195

जुन्नर प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज

जुन्नर – सुनील शांतीलाल बळगट राहते निमगाव सावा स्थानिक असताना, भूमी अभिलेख उपाध्यक्षिक यांच्या चुकीच्या निर्णय मुळे जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम चालू आहे, राहत्या घरचा सिटी सर्वे नंबर 190 याची मोजणी मोरो नं. 277/2014 व मोरो नं. 277/2021, करण्यात आली असून विरुद्ध बाबाजी निवृत्ती गाडगे व चंद्र ताई बाबाजी गाडगे, राजकीय व आर्थिक पाठबळ असल्यामुळे समाजाची संख्याच्या जोरावर, मोजणी मोरो नंबर 901/2023 दिनांक 25/07/2023 या दिवशी जाणीवपूर्वक चुकीची मोजणी करून हिंदू मुस्लिम या ठिकाणी राहत असताना तेड निर्माण करायचं काम हे भूमी अभिलेख उपाधीक्षक यांनी केले आहे.
सुनील शांतीलाल बळगट यांनी दिनांक 27/7/2013 रोजी उपाधीक्षक भूमि अभिलेख जुन्नर यांना तक्रारी अर्ज दिला व दोन्ही मोजणीची चौकशी केल्याशिवाय क प्रत देण्यात येऊ नये याबाबत सुनील शांतीलाल बळगट यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख जुन्नर यांची वरांवर भेट घेऊन विनंती केली असून फक्त आणि फक्त उडवाउडवीचे उत्तर दिले जात होते. आरटीआय च्या माध्यमातून पत्र व्यवहार करून सुद्धा कोणत्याही पत्राचं योग्य ते उत्तर आले नाही. जिल्हा अध्यक्ष भुमिअभिलेख पुणे कार्यालय चे अधिकारी सूर्यकांत मोरे साहेब यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी यासाठी भूमी अभिलेख उप अधीक्षक जुन्नर मंगल गवळी यांना आदेश देऊन देखील त्या आदेशाचे पालन केले जात नाही. त्याकरिता 28/02/2024 पर्यंत योग्य ते निर्णय घेतला नाही तर इच्छा नसताना देखील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भूमी अभिलेख कार्यालय जुन्नर या ठिकाणी सत्याची लढाई लढण्यासाठी येता 07 मार्च 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता “जन आक्रोश आंदोलन” छेडण्यात येत आहे याची आपण नोंद घ्यावी. असे निवेदन भुमी अभिलेख जुन्नर कार्यालय व जुन्नर पोलिस ठाणे या ठिकाणी पंकज सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष) यांनी दिले, उपस्थित संभाजी राजे राजगुरू(आंबेगाव तालुका सचिव), नाफिस भाई शेख (आंबेगाव तालुका संघटक) व कार्यकर्ते होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here