रानबोथली येथे शिवजयंती उत्सवानिमित्त सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

0
142

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले

ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील रानबोथली येथील शिवस्वराज्य ग्रुप रानबोथली यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चौगानचे उपसरपंच अंकुश मातेरे उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून विजय भागडकर मुंबई उपस्थित होते. उपाध्यक्ष म्हणून उमेश धोटे सरपंच चौगान उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सचिन लिंगायत सरपंच रानबोथली, प्रमोद जीवतोडे सहशिक्षक जि.प. शाळा रानबोथली, वामन मैंद, नरेंद्र नाकतोडे, शंकर भुते ग्रा.पं.सदस्य रानबोथली, नुपेंद्र नाकतोडे ग्रा.पं.सदस्य रानबोथली, शंकर पेंदाम ग्रा.पं.सदस्य रानबोथली, चंद्रकला खरकाटे ग्रा.पं.सदस्या रानबोथली, रमेश राऊत सदस्य से.स.सो.चौगान, जनार्धन नाकतोडे सदस्य से.स.सो.चौगान, उत्तम नाकतोडे सदस्य से.स.सो.चौगान, प्रमोद भर्रे पाटील, दिलीप राऊत आरोग्य सेवक, मिलिंद खरकाटे माजी सरपंच रानबोथली, सुनील मैंद सचिव से.स.सो., रोहीत बगमारे, हरिदास खरकाटे, तुकाराम राऊत, गोपाळा राऊत, ऋषीजी भुते, मुखरू राऊत, प्रकाश खरकाटे, चक्रधर प्रधान, मदन खरकाटे, प्रफुल फुलझेले, शंकर जांभुळे, रामदास मैंद, विक्रम नाकतोडे, गोपाल कुथे, शंकर भुते, दिलीप राऊत, सचिन नाकतोडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. असे ते म्हणाले.
शिवस्वराज्य ग्रुप रानबोथली यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळपासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता गावामधे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आयोजकांतर्फे बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here