
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
‘आम्ही भारतीय लोक’, तालुका-सिंदेवाहीच्या वतीने मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ला सायंकाळी ६-३०वाजता, सोमेश्वर मंदिर जवळ,फटका ग्राऊंड, सिंदेवाही येथे प्रा. श्याम मानव यांचे ‘भारतीय लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यात ते भारत देशासमोर उभी असलेली मोठी संकटे, देशातील राजकीय स्थिती काय आहे?, आपल्याला संविधान हवे की दुसरे काही? या सर्व बाबींवर ते भाष्य करणार आहेत. तरी परिसरातील सर्व स्री-पुरुष नागरिकांनी तथा युवा मित्र आणि मैत्रिणींनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आम्ही भारतीय लोक’ तालुका सिंदेवाही, कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत लोधे यांनी केले आहे.














