
प्रणित तोडे
जिल्हा प्रतीनीधी चंद्रपुर
महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या अहिल्या आश्रम, पुणे या क्रांतिभूमित गगन मलिक फाउंडेशन, पद्मभूमी फाउंडेशन, वेसाक फाउंडेशन पुणे यांच्यावतीने आयोजित थायलंड येथुन प्राप्त सहा फुटाच्या पंचधातुच्या २२ बुध्दरुप (बुद्धमूर्ती) भव्य वितरण सोहळा आज पुणे येथे अत्यंत धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी धम्मदूत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे यांनी उपस्थित राहून सर्वांना भारत बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सोबत आदरणीय भदंत आंनद थेरो, आमचे धम्मबंधु आदरणीय गगन मलिक जी यांच्यासह आयोजक संस्थांचे पदाधिकारी, उपासक-उपासिका व पुणे परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.














