
पुणे प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
पुणे – सच्चाई माता अटल 12 येथे नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावं लागत आहे. संपूर्ण माहिती अशी की गेल्या 5 महिन्यापासून सातत्याने लाईट पोलच्या संदर्भात वारंवार मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून अर्ज सादर करून विविध माध्यमांच्या मार्फत आवाज उठवण्यात आला होता. आंबेगाव खुर्द सच्चे माता परिसर 2006 पासून हळूहळू मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली या भागामध्ये साधारण 20,000 हजार लोकं वस्तीचा परिसर असून देखील 2007 साली पुणे महानगरपालिकेमध्ये हा संपूर्ण परिसर समाविष्ट झाला. परंतु पुणे महानगरपालिका नागरिकांचा टॅक्स गोळा करते मोठ्या प्रमाणात त्या बदल्यात सुविधा कुठल्याही मिळत नाहीत. या भागामध्ये सुविधांचा खूप मोठा प्रमाणात अभाव आहे. लाईट पोलची आवश्यकता 7 आहे. सध्या तेथे 4 बसवण्यात आले आहे. आता सध्या जुने पोल या परिसरामध्ये बसवण्यात आले. नागरिकांची सोय झाल्याने नागरिक आता सुखावले आहेत या भागामध्ये गुन्हेगारी, महिला, मुलींची छेड काढणे नशा करणारे आता या भागामध्ये थोड्या प्रमाणात आळा बसणार आहे. पोलिसांना सुद्धा गुन्हेगार शोधण्यास रात्रीचे सोयीचे झाले आहे. असे मत आम आदमी पार्टीचे पद अधिकारी प्रशांत कांबळे शहराध्यक्ष आनु.जाती यांनी व्यक्त केले नागरिकांनी त्यांचे आभार मानून इतके दिवस फार कष्टाने जीव मुठीत राहून जगणाऱ्या चाळीतील सर्व कन्या,भगिनीं, वृद्ध, अपंग यांना रात्रीचे अंधारात येणे जाणे सोईस्कर झाले आहे. असा नागरिकांकडून सूर उमटू लागला आहे.















