जिल्हाधिकारी,सीईओ,एस.पी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी पत्र..
बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,
उदगीर
उदगीर आज (दि.२०) रोजी मौजे हेर ता.उदगीर येथील पाणी पूरवठ्या संदर्भात मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
हेर हे गाव एकेकाळी विधानसभेचा मतदार संघ राहिलेला असून या गावची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे सद्यस्थितीत या गावाला राचन्नावाडी ता.चाकूर येथून होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठा खंडित करून संगाचीवाडी येथील तलावातून कायमस्वरूपी सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित कार्यालयास परवानगी देणे बाबत तसेच या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र डीपी व वीज जोडणी साठी संगाचीवाडी येथे विहीर,मोटार,पाणी फिल्टर यासाठी परवानगी देणे आणि हेर येथील जलजीवन योजनेतील काम निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य होत असले त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करणे याबाबतीतही पत्र
जिल्हाधिकारी लातूर,निवडणूक निर्णय अधिकारी लातूर,मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर,जिल्हा पोलीस अध्यक्षांना लातूर यांना पूढील कार्यवाहीसाठी गावकऱ्यांच्या वतीने दिलीप बिरादार यांनी दाखल केले.सोबत विजय माने,प्रकाश मिटकरी,राज बेंबडे हे उपस्थीत होते.

