ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार

0
98

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

नागपूर रोडवर सिंदेवाही शहराजवळून खातगाव – भेंडाळा रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रकने रात्री अकराच्या सुमारास एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुचाकी चालक सोनू रमेश कुंभरे वय २६ रा. रहिवासी डोंगरगाव सालोटकर एमएच 34 एएफ 4621 या दुचाकी वाहनाने पळसगाव (जाट) येथून सिंदेवाही कडे येत होते त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून एमएच 34 बीजी 4818 क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत असताना ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक सोनू रमेश कुंभरे हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेची चौकशी करून मृत व्यक्तीला शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक तुषार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस मधुकर पेंदाम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here