prabodhini news logo
Home चंद्रपूर शहरात प्रशासकीय काळात नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या मुजोरीला जबाबदार कोण? – रविकुमार पुप्पलवार

शहरात प्रशासकीय काळात नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या मुजोरीला जबाबदार कोण? – रविकुमार पुप्पलवार

0
235

बल्लारपूर नगरपरिषदेचा कारभार गेल्या 27 महिन्या पासून प्रशासकिय राजवटीत सुरू आहे. वारंवार निवडणूका पुढे ढकलण्यात येत असल्यामुळेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांविनाच अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर नगरपरिषदेचे कार्य सुरू आहे. या प्रकारामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आता यातच नगरपरिषदेतील एका अधिकाऱ्यांकडून एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची घटना समोर येत आहे. प्रशासकीय काळात अधिकाऱ्यांमध्ये इतकी हिम्मत कूठून येत आहे? नगरपरिषदे अधीन असलेल्या प्रज्ञा दारूंडे नामक महिला कर्मचारीला मारहाण करणारी महिला अधिकारी संगीता उमरे अनेक वर्षांपासून बल्लारपुर नगरपरिषदेत एकाच ठिकाणी कशी काय कार्यरत असू शकते? असा सवाल आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी उपस्थित केला आहे. अश्या प्रकारामुळे असे दिसून येते कि नगरपरिषदेचे प्रशासक म्हणजेच मुख्याधिकारी यांचे कोणतेही नियंत्रण इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नाही, या सर्व बाबींकडे स्थानिक आमदार मुनगंटीवार यांचेही दुर्लक्ष होत आहे, असेही पुप्पलवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here