prabodhini news logo
Home चंद्रपूर भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचविले – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचविले – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
133

मौनी बाबा असलेले खासदार अशोक नेते हटवा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

भिसी येथिल प्रचार सभेत भाजप वर निशाणा

डॉ. किरसान हे उच्चशिक्षित व सज्जन व्यक्तिमत्त्व, असा लोकप्रतिनिधी तुमचा असला पाहिजे – विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

खोटी आश्वासने, पोकळ वचने देऊन सत्तेत येतात भाजपने कोलांटी उडी मारली. देशातील प्रत्येक क्षेत्रात प्रचंड लूट माजवून व्यापारी हित जोपासले. तर आता आपकी बार 400 पारचा नारा देऊन देशाच्या पवित्र संविधानाला बदलून हुकूमशाही आणण्याचा डाव भाजपने आखला आहे. मतदारानी जागरूक राहून या षड्यंत्राला उत्तर देण्यासाठी सज्ज होऊन येत्या 19 एप्रिलला इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

भिसी येथील सभेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान, , माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, काँग्रेसचे चिमूर विधानसभा समन्वयक सतीश वारजुरकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेल संघटक धनराज मुंगळे महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे अतिशय सज्जन व्यक्तिमत्व असून ते उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा आपल्या मतदारसंघात होणार असून ते संसदेत आपले प्रतिनिधित्व करून समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहतील याकरिता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने सहकार्य करून विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात, बेरोजगारी महागाई प्रचंड प्रमाणात फोफावली असून देशातील शेतकरी कामगार कष्टकरी मजूर व सर्वसामान्य यांना जगणे कठीण झाले आहे. चारशे रुपयाचा गॅस बाराशेवर नेला, रासायनिक खते, युरिया याची प्रचंड दरवाढ केली व वजनातही घट केली. तसेच जीएसटीच्या नावावर प्रत्येक वस्तूवर कर आकारून भाजप सरकारने सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा वाढवला आहे. तर व्यापारी हित जोपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले. आज देश वाईट परिस्थितीतून जात असून या देशात महिला अत्याचार गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आता या भाजप सरकारचा देशात धर्मांधता पसरवून देशाचे संविधान बदलविण्याचा डाव आहे. गेल्या दहा वर्षात खासदार म्हणून अशोक नेते यांनी लोकोपयोगी कुठले कार्य केले काय..? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच खासदार नेते हे आजवर सर्वसामान्यांच्या समस्या संसदेत मागण्या ऐवजी मौनी बाबा बनले त्यासाठी त्यांना उत्कृष्ट संसद रत्न हा पुरस्कार मिळाला काय असा खोचक टोला देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. देश संकटात आहे आता देशाला वाचविण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे म्हणून येत्या 19 एप्रिल रोजी या हुकूमशाही सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून मतदानाच्या प्रक्रियेतून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here