अंजनगाव सुर्जी भोईपुरा बुधवारा येथील घटना गळती लागलेल्या सिलेंडरने घेतला पेट

0
228

चार चिमुकल्यांसह पाच महिला गंभीर जखमी

मुलांना वाचविण्यासाठी जिन्यावरून आईने मारली उडी

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज,अमरावती
9860768109

अमरावती – (अंजनगाव सुर्जी) शहरातील दाट वस्ती असलेल्या बुधवारा भोईपुरा परिसरातील एका घरात गळती लागलेल्या घरगुती सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने त्याचे रूपांतर मोठ्या आगीत झाले.त्या आगीमध्ये कुटुंबातील व परिसरात राहणारे नातेवाईक असे एकूण ९ जण गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना दि.१५ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास घडली असल्याचे समोर आले आहे.
माहितीप्राप्तीनुसार सुर्जी परिसरातील बुधवारा येथील शिवा चिंना गौर हे आपल्या व्यवसायाकरीता घराबाहेर गेले असता गळती लागलेल्या घरगुती सिलेंडरने अचानक पेट घेतला.आपल्या मुलांसह आई व घराच्या आजूबाजूला राहत असलेले महिला नातेवाईक आगीच्या कचाट्यात आले.गळती लागलेल्या सिलेंडरला आग लागल्याचे दिसताच क्षणी आपल्या चिमुकल्यांना वाचविण्यासाठी गच्चावर गेलेल्या आईने काही विचार न करता लगेच गच्चावरील जिन्यावरून उडी मारली.त्यामधे सदर महिला गंभीर जखमी झाल्याने तिला परतवाडा उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.तर गळती लागलेल्या सिलेंडरच्या आगीने रौद्ररूप धारण केले असता त्या आगीमध्ये आयुष अक्षय गौर (वय ३),पियूष अक्षय गौर (वय ६),हंसिका मनीष गौर (वय ९),हंसिका संतोष गौर (वय १२) ह्या चार चिमुकल्यांसह निकिता अक्षय गौर (वय २६),ममता संतोष गौर (वय ३५),भारती शिवा गौर (वय ५०),उमा लखन गौर (वय ५२),गंगा रामलाल गौर (वय ६५) ह्या पाच महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या.तर आगीच्या कचाट्यात आलेल्या चिमुकल्यांच्या व महिलांच्या आरडा-ओरडा मुळे परिसरातील नागरिकांनी लगेच धाव घेतली.ओले गोणपाट व पाण्याचा शिरकाव करून नागरिकांनी आग आटोक्यात आणली व जखमींना उपचारासाठी अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल नालट,डॉ.तरुण पटेल व चमूने तात्काळ जखमींवर प्राथमिक उपचार केले.दरम्यान डॉक्टरांनी नातेवाईकांच्या मायेपोटी गंभीर जखमी असलेल्या निकिता अक्षय गौर ह्या महिलेला परतवाडा उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले.तर सदर घटनास्थळ परिसरातील नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सी अतिरिक्त पैसे आकारात असून सुद्धा सिलेंडर देताना तपासत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here