prabodhini news logo
Home छत्रपती संभाजीनगर SPI औरंगाबाद/GSPI नाशिक या परीक्षेची तयारी करणाऱ्या SSC डिफेन्स अकॅडमी च्या विध्यार्थ्यांना...

SPI औरंगाबाद/GSPI नाशिक या परीक्षेची तयारी करणाऱ्या SSC डिफेन्स अकॅडमी च्या विध्यार्थ्यांना SPI औरंगाबाद चे माजी संचालक मेजर चंद्रसेन कुलथे यांचे मार्गदर्शन

0
144

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या संरक्षण क्षेत्रातील उच्च पदावर जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींसाठी शासकीय स्तरावर शासन SPI /GSPI या संस्थेत दरवर्षी प्रमाणे परीक्षा घेत असते ही परीक्षा या वर्षी 28 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे.या परीक्षेच्या संदर्भात SPI औरंगाबाद चे माजी संचालक श्रीमान चंद्रसेन कुलथे सर यांनी विध्यार्थ्यांना बदलल्या पॅटर्न आणि आणि मुलाखती संदर्भात विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून मुलाखत विचारले जाणारे प्रश्न आणि विध्यार्थ्यांना द्यावयाचे उत्तर या संदर्भातही मेजर कुलथे यांनी काही टिप्स विध्यार्थ्यांना सांगितल्या आणि सोबतच SSC डिफेन्स अकॅडमी चे संचालक प्रा .अंकुश शेळके सर यांनी विध्यार्थ्यांसोबत हितगुज साधले आणि येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या या मार्गदर्शनासाठी प्रशासकीय अधिकारी प्रा.कृष्णा आघाव, तसेच प्रा.वाकळे, प्रा.सुभाष, प्रा.शुभम घोडके, प्रा.शुभम महाजन, श्रद्धा, शिराळे, जोगदंड, इतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here