राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुण्यात ठाण मांडून ! बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार

0
306

लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी पदाधिकारी यांचा ही समावेश

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना लोकसभेच्या या निवडणुकीत पार्थ पवार यांची काय भूमिका असेल? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पत्रकारांना उददेशुन “पार्थ हा संघटनात्मक जबाबदारी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांभाळतो आहे” असे विधान केले होते. त्यातीच प्रचिती विविध लोकसभा मतदारसंघातून पहायला मिळते असून पार्थ पवार यांच्या झंझावात प्रचाराला सुरवात झाली आहे. गत निवडणुकीत आलेला अनुभव ही त्यांची जमेची वाजु असून या अनुभवाच्या आधारावर अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या असून आलेल्या अनुभवाचा यशस्वी वापर करताना दिसताय. पार्थ पवार यांचे टीमवर्क, संघटन कौशल्य, ही वाखाणण्याजोगी असुन कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या

आदेशानुसार सर्वच स्तरावर प्रचाराला वेग आला असून स्वतः पार्थ पवार हे फिल्डवर तासनतास काम करताना पहायला मिळताय. दररोज लोकांच्या गाठीभेटी घेणे, कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण करणे., दररोज रिपोटींग घेणे, नियोजन करणे, मतदार संघामध्ये फिरून लोकांच्या समस्या जाणून घेणे, या सर्व गोष्टी ते अत्यंत बारकाईने लक्ष देऊन डोळ्यात तेल ओतून काम करताना पहायला मिळताय. त्यांची कामाची योजना, तळमळ, काम करण्याची पद्धत, अचूक नियोजन, वेळेचे नियोजन, नियमांचे काटेकोर पालन, झोकून काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टी पाहुन कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला असून आपल्या युवा नेत्याला काम करतांना पाहत असतानाच कार्यकत्यांमध्ये देखील जोमाने कामाला लागले आहेत. याचा प्रत्यय बारामती मतदारसंघातून पहायला मिळत असुन लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात बारामती मतदारसंघात पश्चिम महारष्ट्र विद्यार्थी अध्यक्ष सोमनाथ लोहार, मुख्य प्रदेश सरचिटणीस विशाल विहिरे तसेच प्रदेश सरचिटणीस केशवजी माने,प्रदेश सचिव चैतन्य पाटील, अमोल भोसले तसेच उदगीर तालुक्यातून प्रदेश सचिव युवराज कांडगिरे,पंकज केंद्रे हे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या सोबत प्रचार चालू असून या व लोकसभेच्या बारामती मतदारसंघात ठाणे मांडून बसले असुन प्रत्येक मतदार संघातील लोकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम विद्यार्थी संघटना करत असुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचता येईल यासाठी विद्यार्थी कॉंग्रेस प्रयत्न करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here