कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव येथील बौध्द समाज नांदगांव, रमाबाई महिला मंडळ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच यांच्या वतीने चंद्रमणी बौध्द विहार नांदगांव यांच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम पुर्ण झालेले असुन त्यांचा लोकार्पण सोहळा दिनांक २२/०४/२०२४ रोज सोमवारला सकाळी ८.०० वाजता पु. भदंत ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचा संघ संघरामगिरी यांचे हस्ते संपन्न होत आहे.
दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले असून दि.२२/०४/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता पु. भदंत ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचा संघ संघरामगिरी यांचे आगमन व स्वागत सकाळी ८.१५ वाजता धम्म ध्वजाचे ध्वजारोहण,त्यानंतर गावात भव्य मिरवणूक( रॅली)काढण्यात येणार आहे. दुपारी १२.३०वाजता परित्रण पाठ व परित धम्मदेशना रात्रो८ वाजता भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन, उगवली पहाट निळया पाखरांची सादरकर्ते अमोल राउत व संच आणि दुसऱ्या दिवसी दि.२३/०४/२४ ला सायंकाळी ६ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे.
तरी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असी विनंती,बौध्द समाज नांदगांव, रमाबाई महिला मंडळ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच यांच्या वतीने करण्यात आली आहे.

