
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- श्रीराम नवमी निमीत्य दि.१९/४/२४ रोजी हंडरगुळी येथे श्रीरामाच्या भव्य मुर्तीची हजारो भक्तांच्या उपस्थितीत शोभायाञा गावातील प्रमुख मार्गावरुन अत्यंत शांततामय व भक्तीमय वातावरणात काढण्यात आली.यावेळी राम-सीता , लक्ष्मन-हणुमान व विठ्ठलाची वेशभुषा व आकर्षक विद्युतरोषनाई जनतेचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी उपविभागीय पो.अधिक्षक मनीष कल्याणकर यांनी भेट दिली. सपोनी.बी.एस. गायकवाड, पोउपनी, एम.के.गायकवाड, पोहेकाॅ. संजय दळवे,पोहेकाॅ. माधव सारोळे, शिवाजी सोनावने,उजेडे, वाडकर, शेटकार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.यावेळी हाळी व परिसरा -तील हजारो रामभक्त हंडरगुळीत आले होते.














