लउदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हाळी-हंडरगुळी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कायदा-सुव्यवस्था व शांतता चांगली असावी.यासाठी येथे एस.पी.सोमय मुंडे यांनी लक्ष घालावे व तात्पुरते पोलीस चेक पोस्ट तयार करावे.अशी मागणी जाणकार हाळी- हंडरगुळीकरातुन होत आहे.. येऊ घातलेली लोकसभा निवडणुक विनाविघ्न व शांततेत संपन्न व्हावी.या करीता प्रशासन सर्तक असुन लातुर जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारलेले पोलीसांचे चेक पोस्ट हे म्हत्वाची भुमिका बजावित असुन अशा प्रकारे येथे ही चेकपोस्ट उभा करणे गरजेचे आहे.कारण येथून गेलेला राज्यमार्ग हा आंध्रप्रदेश,कर्नाटक व तेलंगना या परराज्यांना जोडलेला आहे.आणी येथे चेकपोस्ट नसल्याचा गैरफायदा काळे धंदेवाले घेतात.व या भागातुन राञी,बेराञी गुरांची चोरटी वाहतूक आंन्थ्रात व तेलंगनात होत असते. तसेच परराज्यातुन राञी – बेराञी महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीजर्दा व गुटखा याची इनकमींग {आयात} या मार्गे वाढवणा,सुकणी, वडगाव, शिरुर,अहमदपुर. हाडोळती, कुमठा आदी गावात होत असते. अन् या गावातुन अन्य गावात गुटखा आऊट गोईंग होताना दिसतो आहे. सध्या पोलीसवर्ग जागते रहो..असा पहारा देत असले तरीही काळे धंदे करणारे कांही चतूर माणसं पोलीसांनाच अलगद क्राॅस करुन आपला डाव साधुन घेतात.भारतात सुप्रसिध्द असलेला गुरांचा अडीच दिवसीय बाजार हा हंडरगुळीत भरतो.यामुळे येथे देशाच्या विविध भागातुन हजारो लोकं येतात.यात अनेकजण पैलीस चेकपोस्ट नसल्याचा गैरफायदा पण घेऊ शकतात.या सर्व बाबींचा जिल्हा अधिकारी सौ.घुगे मॅडम व सोमय मुंडे एस.पी.लातुर यांनी गांभीर्याने विचार करावा.आणि येथे पोलीस चेकपोस्ट तात्पुरत्यास्वरुपात ऊभा करावे.अशी मागणी जनतेतून होत आहे.

