कपिल मेश्राम
जिल्हा विशेष प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही – विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य जिज्ञासा फाऊंडेशन तर्फे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत उपस्थित मान्यवरांना संविधानच्या आवृत्ती दिल्या,वाचेल तो वाचेल आणि संविधान हे प्रत्येक घरी असून ते प्रत्येकानी वाचलं च पाहिजे, या साठी विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर ना खरी आदरांजली असेल, असे सामाजिक उपक्रम जिज्ञासा फाऊंडेशन नेहमीच करीत असतो, या कार्यक्रम साठी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले मान्यवर पी. एस. आय सागर महल्ले पो. स्टे. सिंदेवाही, जयश्री कावळे, पंकज नन्नेवार, अमित महाजनवार विस्तार अधिकारी,शिल्पा नागदेवते अधिक्षिका, वसाके मॅडम शिक्षिका, ठाकरे मॅडम शिक्षिका, रहांगडाले सर शिक्षक, नागदेवते सिस्टर, आणि इतर मान्यवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिज्ञासा फाऊंडेशन चे संचालक राकेश अलोणे यांनी केले, तर कार्यक्रमाला सहकार्य सुनिल गेडाम, अक्षय चहांदे, सचिन रामटेके, अक्षय सहारे यांनी केले.

