रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
मेंडकी आज ६ मे २०२४ येथे कुंभार समाज यांच्या वतीने स़ंत गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदरणीय प़ंचायत समिती माजी सदस्य डॉ.थानेश्वर पाटील कायरकर हे होते. तर प्रमुख अतिथी मेडकी ग्रामपंचायत सरपंच मंगला ईरपाते, भावना ईरपाते माजी जि प सदस्या, ब्रम्हपुरी तालुका महिला कॉग्रेस अध्यक्षा सौ मंगलाताई लोनबले, जिल्हा महिला कॉग्रेस महासचिव नयनाताई गुरनुले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर , सुधाकर महाडोरे, माजी सरपंच यशवंत आंबेरकर, विनायक पाकमोडे, भुपाल खोब्रागडे, रमेश बेहरे, मधुकर कोरेवार, आदी पदाधिकारी आणि बहुसंख्येने समाज बांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

