सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर
चंद्रपूर- दि,14 मे आर्य वैश्य समाजाचे आराध्य दैवत वासवी माता श्री कन्यका देवीचा 87 वा प्राण प्रतिष्ठा दिवस आज 15 मे रोजी अतिशय भक्तीपूर्ण व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला,
सर्वप्रथम सकाळी 6 वाजता सर्व देवी देवतांचा अभिषेक करून श्री कन्यका मातेची भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली,ही शोभा यात्रा कन्यका मंदिर येथून गिरनार चौक,गांधी चौक,जटपुरा गेट ते कन्यका मंदिरात येऊन विसर्जित करण्यात आली,या शोभा यात्रेत शेकडो समाज बांधव सहभागी झालेले होते, पुरुषांना पांढरा कुर्ता पायजमा व महिलांना ऑरेंज कलरची साडी हे आजच्या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण होते,उन्हळयाचे दिवस असल्याने समाजातील अनेक गन्मान्य व्यक्ती कडून ठीकठिकानी शीत पेयाची व्यवस्था करण्यात आलेली होती,वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक शिपायाची सुरळीत व्यवयस्था होती,शोभा यात्रे पासून व शीत पेय पासून निघणारा कचरा उचलण्यास मनपा तर्फे विवेक पोतनूरवार यांनी उत्तम व्यवस्था केलेली होती,शोभा यात्रा मंदिरात आल्यानंतर कुंकूम पूजा आटोपून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते,यात अनेक समाज बांधवांनी रक्त दान केले,त्यांनतर दुपारी 12 ते 2 महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता,अंदाजे 1000 समाज बांधवांनी याचा लाभ घेतला,दि. 14 मे ते 18 मे चार दिवस भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे,
चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री. कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्टचे मिलींद कोतपल्लीवार, राजेशवर चिंतावार, संदीप पोशट्टीवार, प्रशांत कोलप्याकवार, अजय मामीडवार, राजेश सुरावार, उदय बुद्धावार श्रीमहेश कललूरवार, श्रीराम झुल्लूरवार, गिरीधर उपग्नलावार,अमित कासमगोट्टूवार, व्यवस्थपक वासुदेव फलके अथक परिश्रम घेत आहेत,सर्व समाज बांधव एकजुटीने कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करीत आहे,

