प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
मुंबई दि.१७ मे २०२४ ते २७ मे २०२४ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अनुमतीने पहिले श्रामनेरी शिबिर २-२-२०२४ ते ११-२-२०२४ ला संपन्न झाले. त्याचाच भाग म्हणून दुसरे श्रामनेरी शिबिर दि.१७ मे २०२४ ते २७ मे २०२४ या कालावधीत चैत्यभूमी दादर मुंबई येथे संपन्न होणार आहे.या शिबिराची सांगता त्यागमुर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनी होणार आहे. या श्रामनेरी शिबिरात महाराष्ट्र राज्यातून ५४ केंद्रीय शिक्षिका सहभागी होणार आहेत.त्यात आमच्या चंद्रपूर जिल्हा (पूर्व) मधून एकूण ६ केंद्रीय शिक्षिका सहभागी होत आहेत.

