भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस आयोजित तिन दिवशीय व्यायाम शिबीर संपन्न

0
272


सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
चंद्रपूर

घुग्घुस – दिनांक 19, 20,21 मे 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा माध्यमातून व यशोधरा महिला मंडळ घुग्घुसचा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार मागील खाली प्रांगणात घुग्घुस येथे तिन दिवशीय व्यायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे आयोजक ESK HEALTH STUDIO चंद्रपूर यांच्या द्वारे करण्यात आला होता. पहिल्या दिवशी ध्यान साधना डॉ. कल्पना बनसोड यांच्या मार्गदर्शनात केले. ध्यान साधना करतांनी बनसोड मॅडम यांनी एकाग्रता कशी करायची त्याबद्दल मार्गदर्शन केले.

सदर व्यायाम शिबीर हे तिन दिवशीय निशुल्क घेण्यात आले. तिसर्‍या दिवशी सर्वांना आरोग्य विषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, चंद्रगुप्त घागरगुंडे, कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर बबन वाघमारे, राहुल बुरड, ESK HEALTH STUDIO चंद्रपूर डॉ. कल्पना बनसोड, रंजीता फुलझेले, प्रज्वला देवगडे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here