कु. प्राची चटप यांना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित

0
68

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदान भंडारा येथे कु. प्राची दुर्गा केशव चटप हिला जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय सावकारे, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, उपवनसंरक्षक राहुल गवई, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. सोयाम आदी मान्यवरांच्या हस्ते कु. प्राची दुर्गा केशव चटप हिचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ तसेच दहा हजार रूपयांचा धनादेश देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.ह्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर उपस्थित होते.

प्राची केशव चटप हीने युवक कल्याण विषयक सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करून मोलाचे योगदान दिले आहे. या कार्याचा गौरव म्हणून सन २०२२-२३ या वर्षाचा जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कु. प्राची केशव चटप ही स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयात बि.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थीनींनी आहे. यापुर्वी प्राची भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार असतांना तिच्या नेतृत्वात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

प्राची चटप हिला जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दक जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के सोयाम, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड, जिल्हा युवा पुरस्कार ( युवक) प्राप्त पत्रकार जयेंद्र चव्हाण, निखिलेश तभाणे, अभय महल्ले, अविनाश निंबार्ते, मुकुंदा ठवकर, जे.एम. पटेल महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, प्राचार्य डॉ. श्रीधर वर्मा, महिला अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या वर्षा चांदेकर, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर, क्रीडा शिक्षक डॉ. भिमराव पवार, रोमी बिष्ट, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, विवेक चटप, डॉ. सचिन शंभरकर, डॉ. यशवंत लांजेवार, डॉ. अतुल टेंभुर्णे, प्रा. वामन तुरिले, सामाजिक कार्यकर्ते जॉकी रावलानी, डॉ. योगेश नाकाडे, समीर नवाज, समसेर खान, अमोल कोटांगले, कार्तिक डोरले,श्री.खंडेरा, के.झेड. शेंडे, प्रशांत बोरकर, सुशील बुरडे, नासीर शेख, साक्य रामटेके, अर्चना मेश्राम, अलिशा नंदनवार, देवेंद्र साकुरे, सुरेंद्र निपाणे, अंसुल बावणे, प्रभू फेंडर, दामोधर मडामे, गजानन केजरकर, यशवंत थोटे, अशोक बन्सोड इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here