prabodhini news logo
Home चंद्रपूर अशोका बुद्ध विहार, गौतमनगर येथे हर्षउल्हासात बुद्ध जयंती साजरी

अशोका बुद्ध विहार, गौतमनगर येथे हर्षउल्हासात बुद्ध जयंती साजरी

0
166


शिलभद्र मंडळ गौतम नगर भद्रावती द्वारा महाकारूणी तथागत भगवान बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

भद्रावती- दिनांक 23 मे 2024 ला दोन सत्रा मध्ये अशोका बुद्ध विहाराच्या प्रांगणात जयंती साजरी करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता शीलभत्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे ध्वज रोहन करून पहिल्या सत्राची सुरुवात केली. सदर कार्यक्रमाला उपस्थित व उपासक उपासीकांनी सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण केली पहिल्या सत्रामध्ये संचालन जय भीम भगत सरांनी केले. दुपारी ११:३० वाजता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. दुपारी दीड वाजता जनरल नॉलेज स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी ७:30 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष जवादे साहेब यांनी महाकारूणी तथागत गौतम बुद्ध व भारतीय संविधानाची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन धम्मचारी चंद्रवीर आंतरराष्ट्रीय धम्मचारक यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे स्वर्गीय निवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रवींद्र शिंदे यांनी ट्रस्ट द्वारा चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व पहिल्या सत्रामध्ये विजेता झालेला विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. शीलभद्र मंडळाच्या उपाध्यक्ष भावना खोब्रागडे व उपस्थित उपासिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रवींद्र शिंदे यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला ट्रस्ट अध्यक्ष धनराज आस्वले तथा ट्रस्टच्या सचिव रूपाली रवींद्र शिंदे या प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाची संचालन अनिल भगत यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भाऊ रामटेके यांनी केली.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भद्र मंडळाच्या उपाध्यक्ष भावनाताई मिथुन खोब्रागडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शरद भावे, सागर कांबळे, कुलदीप कांबळे, पुनीत नगराडे, अनिल बांबुर्डे, हरिदास जवादे, सुरेश टेंभुर्णी, कांबळे, चंदन पेटकर, सचिन गवई, विजय सपकाळ, संदीप मेश्राम, कुणाल झाडे, गुलाब लोणारे, दीपक हिवाळे त्याचप्रमाणे सारिका पताडे, जयतुरा खोब्रागडे, भगत काकू, रामटेके काकू, ताराबाई खोब्रागडे, गयाबाई कांबळे, नगराडे काकू, गवई काकू, हेमा गेडाम, मेघा कांबळे, मीरा बुरुचुंडे, वनिता रामटेके, प्रांजू कांबळे, शालिनी हिवाळे व शीलभद्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here