Home ठळक बातम्या ५ रुपयांच्या गुटख्यात ५ लाखांचं केशर? विमल जाहिरातीवरून शाहरुख, अजय, टायगरला कोर्टाची...

५ रुपयांच्या गुटख्यात ५ लाखांचं केशर? विमल जाहिरातीवरून शाहरुख, अजय, टायगरला कोर्टाची नोटीस

0
43

मुंबई/बारां (राजस्थान) प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : ५ रुपयांच्या गुटखा पाकिटामध्ये ५ लाख रुपये किलोचे महागडे केशर असल्याचा दावा करणाऱ्या विमल पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ तसेच कंपनीचे मालक विमल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजस्थानमधील बारां जिल्हा ग्राहक न्यायालयाने या सर्वांना नोटीस बजावत ९ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
एका नागरी हक्क संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीत, विमल पान मसाल्याच्या जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ ५ रुपयांच्या गुटखा पाकिटात ५ लाख रुपये किलो किमतीचे केशर असल्याचा दावा वास्तवाशी विसंगत असून तो ग्राहकांची फसवणूक करणारा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच अशा जाहिरातींमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात असून आरोग्यासाठी घातक असलेल्या उत्पादनांचे आकर्षक प्रचाराद्वारे समर्थन केले जात असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.
ग्राहक न्यायालयाने सर्व संबंधितांना ३० दिवसांच्या आत आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. निर्धारित मुदतीत उत्तर न दिल्यास एकतर्फी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, संबंधित जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याच्या मागणीवर पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार असून या प्रकरणाकडे देशभरातील ग्राहक संघटना आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here