prabodhini news logo
Home चंद्रपूर मृतकाची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

मृतकाची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

0
116

चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर, दि. 27 : दुर्गापुर हद्दीतील तुकुम परीसरातील डॉ. गंधे हॉस्पीटल समोर एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 45 ते 50 वर्षे वयोगटातील इसम हा मृत अवस्थेत मिळून आल्याने पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे नोंद असून पुढील प्रक्रिया तपासावर आहे.

मृतकाचे वर्णन : वय 45 ते 50 वर्षे, वर्ण- काळा, उंची -5 फुट 2 इंच , बांधा- सडपातळ, डोक्यावरील केस बारीक काळे पांढरे, दाडी मिशी जाड, अंगात मेहंदी रंगाची हाप टी-शर्ट व काळया रंगाचा जिन्स घातला आहे. वरील वर्णनाचे मृतकाबाबत माहिती असल्यास पोलिस स्टेशन दुर्गापुर मो.क्र.7887891003 तसेच पोलीस निरीक्षक – लता वाढीवे 9923029083, पोलिस निरीक्षक गिरीश मोहतुरे 9823184879 येथे संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here