prabodhini news logo
Home ठळक बातम्या विदर्भाची वाघीण प्रसिद्ध समाजसेविका मनीषा तिरणकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

विदर्भाची वाघीण प्रसिद्ध समाजसेविका मनीषा तिरणकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

0
234

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

यवतमाळ – गेल्या अनेक वर्षांपासून समाजात प्रबोधन करण्यासाठी कविता लिखाण करणाऱ्या, स्त्रियांसाठी कायदे विषय सल्ला शिबीर घेऊन स्त्रियांना कायदे विषयक सल्ला उपलब्ध करून देणाऱ्या, जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्य विषयक शिबीर घेणाऱ्या, महिला अत्याचार रोखण्यासाठी महिला अत्याचार विरोधात परिसंवाद सेमीनार घेणाऱ्या, महिलांचे सामाजिक आर्थिक व राजकीय प्रश्नावर सामाजिक प्रबोधन मेळावे घेणाऱ्या, विशेष करून मागासवर्गीय स्त्रिया, अल्पसंख्यांक समाजातील स्त्रिया, यांचा समाजातील सलोखा निर्माण करण्यासाठी प्रबोधन मेळावे संगठित करून महिलांना संघटित करणाऱ्या, तसेच असंघटीत क्षेत्रातील स्त्रिया, मजूर कामगार क्षेत्रातील स्त्रिया यांच्यासाठी रोजगार निर्मिती प्रबोधन शिबीर घेऊन त्यांना रोजगारासाठी जागरूक करणाऱ्या, समाजातील अत्याचार पिडीत महिलांसाठी सामाजिक आंदोलने उभे करून पीडित महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या, गुन्हेगारी मुक्त समाज निर्माण करण्यासाठी क्षेत्रात प्रबोधन शिबीर घेवून तेथील लोकांना मार्गदर्शन करणे व त्यामुळे होणाऱ्या मानवी वाईट परिणाम या बद्दल कायद्याचा अभ्यास असणाऱ्या तज्ञा कडून मार्गदर्शन शिबिर घडवून आणणाऱ्या तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिबांची मदत करणाऱ्या विदर्भाची वाघीण येवतमाळच्या प्रसिद्ध समाजसेविका सौ.मनीषाताई तिरणकर त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा “समाज रत्न पुरस्कार 2024” पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक जोंधळे व आयोजक आजमत खान यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार दिनांक 11 जून रोजी मुंबई येथील मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान येथे राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री मा.ना. अनीलजी पाटील व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्येष्ठ संगीतकार दिलीप सेन, विक्रम काळे, व प्रताप भैया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अरुण मराठे हे आहेत. सदरील कार्यक्रमाचे आयोजन एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी केले आहे. सदरील पुरस्कार मनीषा तिरणकर यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here