
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
साहित्य दर्पण कला मंच, नागपूर आयोजित दिनांक २२ ते २३ मे २०२४ या कालावधीत तथागताची वाणी (तथागत गौतम बुद्ध) या विषयावर ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती.सदर स्पर्धेचा निकाल दिनांक १८ जूनला जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक आत्माराम कदम, उत्कृष्ट क्रमांक दिपककुमार सरदार, प्रथम क्रमांक नागोराव सोनकुसरे, सुवर्णा पाटुकले, व्दितीय क्रमांक रूपाली निखारे प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख, समाधान लोणकर तृतीय क्रमांक डॉ. मंदा पडवेकर, आशा फुल्लुके, मधुकर गोपनारायण ,पराग पटले लक्षवेधी क्रमांक डॉ.रेखा पौडवाल, गिरीश भट , श्रद्धा शिंदगीकर, स्मिता शिनकर, रजनी राज अहेरराव, ज्योत्स्ना दोंदलकर, योगिराज कोचाडे, उत्तेजनार्थ क्रमांक सिताराम नरके , शरद पुगांवकर, कल्पना पवार , सुजाता उके, नम्रता खरे , भावस्पर्शी माला मेश्राम, खंदारे सूर्यभान गुणाजी, जयद्रथ आखाडे, सुरेंद्र पाटील, साधना ब्राम्हणकार, प्रा. हंसराज रंगारी यांनी मिळविला.
विजेत्या कवी कवयित्रीचे समुह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर, समुह संस्थापक प्रा. नानाजी रामटेके, समुह कार्याध्यक्षा लोपामुद्रा शहारे, समुह प्रशासिका वैशाली खंडारे, समुह मार्गदर्शक हरिश्चंद्र धिवार यांनी अभिनंदन केले आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.














