
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही -दिनांक 17/06/2024 रोज सोमवारला सिंदेवाही येथील स्थानिक रहिवासी कन्हैया तुलशीदास मुळेवार रा. प्रभाग क्रमांक :- 15 शास्त्री चौक सिंदेवाहि, यांची दोन वर्षीय मुलगी “कुमारी कुंजल कन्हैया मुळेवार” हिचे अंगनात खेळत असताना “अचानक घरासमोरील पेटत्या कचऱ्याच्या ढिगारयात तोल गेले असता शरीर जळाल्याची घटना मागील काही 15 दिवासाआधी घडली सदर पीड़ित बालिका अत्यंत त्रासात असल्याने सर्वप्रथम कौटुंबिक संबंध जपत नगरसेवक युनुसभाई शेख यानी आवश्यक ते सहकार्य करीत सदर दुःखद घटना प्रथमत: नगराध्यक्ष श्री स्वपनिल कावळे आणि उपाध्यक्ष मयूर सूचक यांना कळविले तेव्हा सदर्रील बालिकेसोबत घडलेल्या घटणेची दखल घेत सदर माहीती राज्याचे विरोधिपक्ष नेते मा. ना. श्री विजय वडेट्टिवार यांचे पर्यंत पोहोचवीली तेव्हा “त्वरित दखल घेत चिमुकल्या बालिकेच्या प्रकृतीची अवस्था जाणून घेतली आणि नगराध्यक्ष श्री स्वप्निलजी कावळे यांना सूचना देत मा. ना. श्री विजयभाऊ वडेट्टिवार साहेब यानि, नगराध्यक्ष श्री स्वप्निल कावळे यांचे हस्ते रुग्णाच्या उपचारार्थ सहकार्यपर मदत पाठवीली आणि पुढे काळजी घ्या ऐसा मोलाचा सल्ला देत “भावनिक साद” सुद्धा दीली.. यावेळी प्रामूख्याने नगराध्यक्ष स्वप्निलजी कावळे, उपाध्यक्ष मयूरभाई सूचक, नगरसेवक युनुसभाई शेख़, सौ मिनाक्षिताई मेश्राम नगरसेवीका, सौ, निताताई रणदिवे नगरसेविका, स्थानिक नगरसेविका पूजाताई विलास रामटेके, इत्यादि मान्यवर सहकार्यपर मदत करताना उपस्थीत होते.














