कचरू मानकर
तालुका प्रतिनिधी,
गोंडपिपरी
गोंडपिपरी – भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अर्तगत तालुका शाखा गोडपिपरी येथे कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 23/6/ 2024 ला गजानन कॉलेज गोडपिपरी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संदेश निमगडे संरक्षण विभाग उपाध्यक्ष हे होते. तर उद्घाटक मा.डॉ. राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पूर्व तसेच प्रमुख वक्ते1) मा.रवी भगत केंद्रीय शिक्षक यवतमाळ, तसेच २) मा.तुलाराम राऊत केंद्र शिक्षक गडचिरोली तथा प्रमुख पाहुणे मा. रमेश मानकर संस्कार विभाग जिल्हा चंद्रपूर पूर्व तसेच मा.विजयाताई रामटेके जिल्हाध्यक्ष महिला, मा. लोमेश खोब्रागडे सरचिटणीस चंद्रपूर जिल्हा पूर्व, मा. घनश्याम भडके कोषाध्यक्ष मा. दर्शना दुर्गे तालुका अध्यक्ष महिला गोंडपिपरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व बुद्ध वंदनेने झाली.
आलेल्या प्रमुख दोन्ही वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली मातृसंस्था यांचे उद्दिष्टे, कार्यकारणीतील जबाबदाऱ्या व त्यांची कर्तव्य व भारतीय बौद्ध महासभेच्या इतर कार्याबाबत सखोल असं मार्गदर्शन दोन्ही वक्त्यांनी उपस्थिताना केल.
कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटक डॉ राजपाल खोब्रागडे यांनी भारतीय बौध्दमाहासभे मार्फत चालवत असलेल्या 24 प्रकारच्या शिबिराचे आयोजन करुन प्रत्येक माणसापर्यंत धम्म पोहोचवण्याचे काम जिल्ह्यभर चालू आहे व धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तावाडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर दुर्गे यांनी केले तर आभार अँड सचिन फुलझेले यांनी मानले.

