परळी प्रतिनिधी
प्रबोधीनी न्युज
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील बौद्ध धम्म केंद्राचा निधी मंजूर करून घ्यावा अशी मागणी साप्ताहिक मानपत्राचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री तथा राज्याचे क्रुषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे केली असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकादवारे केली असल्याची माहिती दिली….. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा गाजावाजा करून व भव्य असा उदघाटन समारंभ घेऊन थाटात उदघाटन केले त्याला आज पाच वर्षे होऊन गेले त्यात गेल्या पाच वर्षे भरात अनेक प्रकारचे विकास निधि आनला परळी शहरातील तिर्थक्षेत्र विकास निधि आणुन वैजनाथ मंदिरासह विविध धार्मिक स्थळे सामाजिक सभागृह आदी विकास कामे अर्धवट का होईना पण चालू व केले हि आहेत. परंतु बौद्ध धर्मियांना फक्त जयंतीला पैसे देऊन गप्प बसविण्या शिवाय सदरील बौद्ध धर्म केंद्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून याचे परीणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत झाल्या शिवाय राहणार नसल्यामुळे वेळीच लक्ष देवुन म्हणजे उदया होणारया शेवटच्या पावसाळी अधिवेशनात तरी या धम्म केंद्र यासाठी निधि मंजूर करून घ्यावा अशी ही मागणी करण्यात आली असल्याची माहिती साप्ताहिक मानपत्राचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे बिड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.

