prabodhini news logo
Home गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील एकोणतिसाव्या सत्रात विलास गणपत टिकले विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील एकोणतिसाव्या सत्रात विलास गणपत टिकले विजयी

0
91

राहुल वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली – गडचिरोली स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे एकोणतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी विलास गणपत टिकले यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “पंढरीच्या पांडुरंगा” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
विलास गणपत टिकले हे कोकडी (ता.देसाईगंज) येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवी /कथाकार आहेत. त्यांना मराठी आणि हिंदीतून कथा , कविता, चारोळ्या व लेख लिहीण्याचा विशेष छंद आहे. अनेक कथा, कविता, लेख व चारोळ्यांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या असून विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या एकोणतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने गजानन गेडाम, पुनाजी कोटरंगे, जयराम धोंगडे, संगीता ठलाल, उपेंद्र रोहनकर, शैला चिमड्यालवार, राजू सोनटक्के, वंदना सोरते, डॉ.चंद्रकांत लेनगुरे, प्रेमिला अलोने, अतुल काशिनाथ गंडाटे, माधुरी अमृतकर, पुरुषोत्तम ठाकरे, रोहिणी पराडकर, केवळराम बगमारे, मुरलीधर खोटेले,विलास टिकले, कु. भावना रामटेके, प्रिती ईश्वर चहांदे, गणेश रामदास निकम, प्रब्रम्हानंद मडावी, मिलींद बी. खोब्रागडे, तुळशीराम उंदीरवाडे, सोनाली रायपुरे, प्रियंका वाकडे, डॉ. मंदा पडवेकर, किशोर बोरकुटे, खुशाल म्हशाखेत्री, वामनदादा गेडाम, रेखा दिक्षित, रंजना चुधरी, विलास जेंगठे, डॉ. मंदाकिनी चरडे, यु.एन.राऊत, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. – चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here