prabodhini news logo
Home ठळक बातम्या नांदुरा शहरातील गांधी चौक भागातील चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहाने विनम्र...

नांदुरा शहरातील गांधी चौक भागातील चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहाने विनम्र अभिवादन करून साजरी

0
103

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – नांदुरा शहरातील सामाजिक धार्मिक व लोकोपयोगी उपक्रम नेहमीच अग्रेसर असणारे चंद्रशेखर आझाद मंडळ नांदुरा यांनी भारतमातेचे महान सुपुत्र क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांचे जयंती मोठ्या उत्साहाने गांधी चौक भागातील क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद जी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री चंद्रशेखर आझाद यांचे प्रतिमेला सर्व प्रथम माजी संस्थापक अध्यक्ष सुरेश दादा पेठकर यांनी पुष्पहार अर्पण करून त्या नंतर पदाधिकारी संजय भाऊ कवडे. दिनेश पांडव. महेश पांडव. सोनु जयस्वाल. सागर इंगळे. शुभम जयस्वाल. हरिभाऊ श्रीसागर. प्रवीण वसतकार. भगवान बनसोड. शिवा भाऊ कवडे. अनिल वसतकार. पवन कुमार तायडे. एकनाथ कवडे. काजळे महाराज. निलेश जैन. अनेक मान्यवर व्यक्ती व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
त्यावेळी महान देशभक्त लोकमान्य टिळक व भारतमातेचे महान सुपुत्र क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांचे जयंती निमित्त त्यांचे जीवनचरित्र व देशभक्ती यांचे तरूण पिढीला प्रेरणा देणारे व त्यांच्या बलिदान सार्थकी लागले तरूण पिढीला देशभक्ती जागृत व सामाजिक लोककल्याणकरी आवड निर्माण व्हावी अशी अपेक्षा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादा पेठकर यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी नगर सेवक संजय भाऊ टाकळकर व माजी नगर सेवक राजु ऊर्फ लाला जयस्वाल . प्रकाश राऊत. अजय टाकळकर. हर्षल पांडव. कैलाश डांगे. यावेळी विशेष अशोक रांगदडे. यांनी जागा ऊपलब्ध करून दिली. पिंटू रगदळे यांनी परिश्रम घेतले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here