रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी – ब्रम्हपूरी तालुक्यातील मालडोंगरी येथील रहीवासी असलेल्या शेवंताबाई शामराव नेवारे (वय ६५ वर्ष) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्यस्थितीत वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र शेवंताबाई यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वैद्यकीय उपचार घेतांना त्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे ब्रम्हपूरी येथील जनसंपर्क कार्यालय गाठले. व झालेल्या प्रकाराबाबत काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांना माहिती देत आपली आपबिती सांगितली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सदरची बाब राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी आपल्या कडून सदर महीलेच्या वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना जिल्हा काॅंग्रेस कमेटीचे सचिव तथा न.प.माजी सभापती विलास विखार यांच्यासह अन्य काॅंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

