मनसेच्या मागणीला यश दुसऱ्याच दिवशी पूलाकाठावरील खड्डे दुरस्त

0
429

किरण मेश्राम तालुका प्रतिनिधी पोंभुर्णा – पोंभूर्णा :- तालुक्यातील बोर्डा बोरकर ते बोर्डा झुलुरवार या मार्गावरील नाल्याच्या पूला काठाला मोठ मोठे खड्डे पडले होते त्यामूळे या मार्गावरून वाहतुक करणे पायदळ चालने त्रासदायक झाले असल्याने या मार्गावरील पूलाकाठाला पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे हि मागणी पोंभूर्णा मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांनी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पोंभूर्णा यांना निवेदनद्वारे केली होती समस्येचे गार्भीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आज पूलाकाठावरील खड्डे दुरस्त केले त्यामूळे येथील नागरींकाना दिलासा मिळाला असून या मार्गाणी आता वाहतूक करणे सुलभ झाले आहे निवेदनाची तात्काळ दखल घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण केल्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभाग पोंभूर्णाचे मुख्य अभियंता साहेब व टिमचे मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम आणि मनसे तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here