राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क राजुरा – आज दि 28 जुलै राजुरा तालुक्यातील मारोडा येथे रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात 210 लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला त्यात त्यांना औषधाचे वितरण सुद्या करण्यात आले. प्रकल्प निर्देशक डॉ. आसावरी देवतळे यांच्यासोबत डॉ. सोनम कपूर यांनी गरोदर मातांची तपासणी केली तसेच गावातील रुग्णाची तपासणी केली .
गावातील सरपंच संगीता धोटे यांनी पुढाकार घेऊन समाज भवन उपलब्ध करून दिले.
या शिबिरा करता अध्यक्ष रोटे अजय पलारपवार, रोटे, मिलिंद बोडखे, रोटे. राजेश गण्यारपवार ,रोटे. नंदा अल्युरवार, रोटे. शितल गहुकार , डॉ. आसावरी याचां स्टाफ व रोटरी सदस्य यांची उपस्थिती होती. शिबिरा नंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

